Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमराठवाडा

मराठवाडा पुरग्रस्तांसाठी रोहित गोलांडे सोशल वेल्फेअरचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

पिंपरी | अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी रोहित गोलांडे सोशल वेल्फेअर तर्फे आणि सहकार्यांच्या माध्यमातून “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत धान्य, अन्नधान्य, कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेला मदतीचा टेम्पो रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी चिंचवड येथून पूरग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आला.

परांडा तालुक्यातील शिराळा ग्रामपंचायतीच्या परिसरात या मदतसामुग्रीचे वितरण करण्यात आले. मदतकार्याच्या वेळी गावचे सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक सहकारी मंडळी उपस्थित होते. गावकऱ्यांनी उत्साहाने सामाजिक कार्यात सहभाग घेत, पूरग्रस्तांना दिलासा देणारे हे कार्य कौतुकास्पद ठरले.

हेही वाचा      :        IAS शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व कामांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ‘RTI’ 

ग्रामस्थांनी व्यक्त केले की, “समाजावर ओढवलेल्या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणं हीच खरी देशसेवा आहे. आपल्या छोट्या प्रयत्नामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल, तर त्याहून मोठं समाधान दुसरं नाही.”

“एक हात मदतीचा” हा उपक्रम केवळ मदतकार्य न राहता, संवेदना आणि एकतेचा संदेश देणारा ठरला आहे. भविष्यातील सामाजिक कार्यासाठी हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

“समाजावर ओढवलेल्या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणं हीच खरी देशसेवा आहे. आपल्या लहानशा प्रयत्नामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार असेल, तर त्याहून मोठं समाधान काही नाही.”

— रोहित गोलांडे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button