ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पूर्णानगरमधील कचरा ‘डंम्पिंग ग्राउंड’ झाले चकाचक!

पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पाडुळे यांचा विधायक पुढाकार!

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्र. 11 मधील पूर्णानगर परिसरातील नक्षत्र फेज 1 च्या मागील मोकळी जागा तसेच साई दीप अपार्टमेंट जवळील मोकळ्या जागा म्हणजे बेकायदेशीर कचरा ‘डंम्पिंग ग्राउंड’ बनले होते. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. यावर पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पाडुळे यांनी विधायक पुढाकार घेतला आणि परिसर चकाचक करण्यात आला.

नक्षत्र फेज 1 आणि साई दीप अपार्टमेंटजवळील मोकळ्या जागांची स्वच्छता मोहीम करावी. यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षत्र फेज 1 आणि साई दीप अपार्टमेंटजवळील मोकळ्या जागांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पुढाकार घेतला. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात साफसफाई व स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि परिसराच्या सौंदर्यीकरणाचा विचार करून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

हेही वाचा     :        नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल; विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील मोकळे भूखंड डम्पिंग स्टेशन बनल्याचे दिसत आहेत. कचरा, बांधकामाचा राडारोडा, इलेक्ट्रॉनिक वेस्ट राजरोसपणे येथे फेकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावर कोणाचाच निर्बंध नसल्याने येथे कचऱ्याचे ढीग वाढताना दिसत आहेत. टाकणारे टाकून जात आहेत; मात्र त्याचा त्रास आसपास राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करावी. कचरा टाकू नये… असे फलक संबंधित ठिकाणी लावावेत. यासह नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अरुण पाडुळे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक आला आहे. देश-राज्य पातळीवर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी करणाऱ्या शहराचे आपण नागरिक आहोत. त्यामुळे सार्वजनिक आणि मोकळ्या ठिकाणी कचरा फेकू नये. महापालिकेच्या आवाहनानुसार, कचऱ्याचे विलगीकरण आणि वर्गीकरण यासाठी नागरीकांनी पुढाकर घेतला पाहिजे. आपले शहर आपणच स्वच्छ ठेवले पाहिजे. आगामी काळात स्वच्छ आणि सुंदर पूर्णानगर यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी पुढाकार घेणार आहे.
– अरुण पाडुळे, अध्यक्ष, पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठान.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button