काकड आरतीमुळे भक्तिभाव वृद्धिंगत: खासदार श्रीरंग बारणे
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे काकड आरतीचे आयोजन

पिंपरी-चिंचवड : मुक्ताई उद्यान, यमुनानगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सालाबादप्रमाणे काकड आरतीचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. या आरतीच्या समाप्ती निमित्त ह.भ.प. चैतन्य महाराज बारावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सौ. उमाताई खापरे, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहरजी भिसे, तसेच नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, सचिन चिखले, ह.भ.प. शशिकिरण गवळी, कमलताई घोलप, शुभांगीताई बोऱ्हाडे, तानाजी खाडे, उद्योजक तानाजी शिंदे, आशाताई भालेकर, नितीन बोन्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “काकड आरतीमुळे पहाटे भक्तिभाव वाढतो, आत्मिक समाधान लाभते आणि पांडुरंगाचे आशीर्वाद सर्वांवर राहतात.” आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या शुभहस्ते मंदिराच्या कळसाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच मुक्ताई उद्यानातील पाथवे साठी त्यांच्या आमदार निधीतून ₹10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर झालेल्या पांडुरंगाच्या पालखीच्या नगरप्रदक्षिणेत त्या सहभागी झाल्या.
हेही वाचा – कृषी समृद्धी योजनेला राज्य सरकारची मंजुरी; शेतकऱ्यांसाठी ड्रोन, शेततळे व बीबीएफ यंत्रास अनुदान

सुमारे 300 हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. काकड आरतीचे संपूर्ण नियोजन ह.भ.प. अनंत महाराज मोरे, ह.भ.प. शशिकिरण गवळी महाराज, मंगल महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मंदिराच्या संस्थापिका आणि शिवसेना उपनेत्या सौं. सुलभाताई उबाळे, अध्यक्ष अंकुश जगदाळे, कार्याध्यक्ष तुकाराम वारंग, सहकार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव अजिंक्य उबाळे, खजिनदार गणेश इंगवले, सहखजिनदार प्रदीप बेळगांवकर, उपाध्यक्ष आप्पा काळोखे आदींनी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
महाप्रसादाचे मानकरी उद्योजक तानाजी शिंदे, संतोष सौंदणकर, अजिंक्य उबाळे व नितीन बोन्डे हे होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंदिर समितीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्तांनी अथक परिश्रम घेतले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“मुक्ताई उद्यानातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ही केवळ उपासनेची जागा नसून भक्तांना एकत्र आणणारे, समाजात एकात्मतेचा संदेश देणारे केंद्र आहे. दरवर्षी होणारी काकड आरती ही परंपरा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पहाटेचा हा भक्तिमय क्षण प्रत्येकाला आत्मिक शांती व सकारात्मकतेचा अनुभव देतो. या उपक्रमात स्थानिक नागरिक, मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट हेच आमच्या सेवाभावाचे खरे बळ आहे.”
– अंकुश जगदाळे, अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा भावी समिती ट्रस्ट.




