Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सरकारी कर्मचाऱ्यांना लेटमार्कपासून मोठा दिलासा; अर्धा तास उशिरा ड्युटीवर हजर राहण्याची मुभा

मुंबई : महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. अर्धा तास उशिरा ड्युटीवर हजर राहण्याची मुभा देत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती पावसाळी अधिवेशनात दिली आहे.

मंत्रालयापासून ते ग्रामीण भागातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ठरलेल्या वेळेत कार्यवाहीन वेळेत हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, काही कर्मचाऱ्यांना कार्यवाहीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे काही कारणास्तव अडचण येते त्यामुळे त्यांना लेटमार्कच्या कारवाईला सामोरे जावे लागते. दरम्यान, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

नेमका निर्णय काय आहे?

मंत्री सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यवाहीन वेळेत हजर राहताना १० मिनिटांपर्यंत सवलत दिली होती. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून ही वेळ ३० मिनिटे अर्थात अर्ध्या तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सध्या हा निर्णय केवळ मुंबईसाठी घेण्यात आला आहे. “कार्यालयातील गर्दी कमी करणे आणि मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ठराविक वेळेतील दररोजचा वाढता भार कमी करणे” असा उद्देश असल्याचे सरनाईक यांनी सभागृहात सांगितले आहे.

हेही वाचा –  रस्ता डांबरीकरणाच्या मागणीसाठी चिखलात बसून आंदोलन !

तसेच, सरकारच्या वतीने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार करण्यासाठी आगामी काळात टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल अशी घोषणादेखील सरनाईक यांनी सभागृहात केली आहे.

एकूण कामाचे तास बदलणार नाही

या निर्णयासोबतच सरनाईक यांनी यावेळी जर अर्ध्या तासाने कामाला सुरुवात केली तरी सायंकाळी कामाचे तास वाढतील. एकूण कामाचे तास बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, राज्यातील मंत्र्यांकडून प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाण्यासाठी पर्यत्न सुरु असल्याचे म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button