Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस आयुक्तसाहेब, वर्दीतील सावकारांवर काय कारवाई करणार?

माजी नगरसेवक बाळासाहेब हिंदळेकर यांचा सवाल: वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवड:  पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अवैध सावकारी प्रकरणांवर कारवाईसाठी आयुक्तांनी निर्देश दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशाच प्रकरणात पोलीस खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप माजी नगरसेवक बाळासाहेब तथा संभाजी अर्जुन हिंदळेकर यांनी केले आहेत.

खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून चिखली येथे एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात मुलगा व आईचा मृत्यू झाला तर वडील बचावले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खासगी सावकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदळेकर यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन पोलीस खात्यातील सावकारांवरही कारवाई करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब हिंदळेकर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे की, काही वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः सावकारी व्यवसाय चालवत आहेत. एका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर मनमानी कारभाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सावकारी प्रकरणात गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा –  गावागावातील समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांची ‘‘ग्राऊंड व्हीजिट’’!

हिंदळेकर यांनी असा आरोप केला की, त्यांचे जावई अतुल मुंडे यांच्यावर उपनिरीक्षकांच्या हस्तक्षेपाने बळजबरी केली गेली. व्याजाने दिलेल्या रकमेची जबरदस्तीने वसुली करण्यासाठी मारहाण, अपहरण आणि धमक्यांचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पोलीस निरीक्षकांवर तक्रार दाखल करून न घेण्याचा आणि तपासासाठी टाळाटाळ केल्याचा आरोपही केला.

अवैध सावकारांच्या दबावाखाली, त्यांच्या जावयावर आणि मुलावर दुसऱ्या एका पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप हिंदळेकरांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही पोलीस अधिकारी सावकारांचे समर्थन करत असून, त्यांच्या विरोधात दिलेल्या अर्जांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या भूमिकेकडे लक्ष…

हिंदळेकर यांनी पोलीस आयुक्तांना आवाहन केले आहे की, जर पोलीस खात्यातीलच अधिकारी सावकारी व्यवसायात गुंतलेले असतील, तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? सावकारी व्यवसाय फोफावण्यास काही पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब हिंदळेकर यांनी त्यांच्या अर्जाद्वारे संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सावकारी व्यवसायात गुंतले असल्याचे आरोप गंभीर आहेत. याप्रकरणी तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची गरज आहे. याबाबत आयुक्त विनय कुमार चौबे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button