Pimpri-Chinchwad Ganeshotsav : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ताथवडे-पुनावळेतील सोसायटींसाठी ‘‘गणपती सजावट स्पर्धा’’
सोसायटीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे यांचा विधायक उपक्रम
पिंपरी । पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ताथवडे-पुनावळे परिसरातील सोसायटी गणपती सजावट स्पर्धा-2024 या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला सोसायटीधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार आणि शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे ‘‘सोसायटी गणपती सजावट स्पर्धा-2024’’ आयोजित केली आहे.
या स्पर्धेमध्ये जवळपास ताथवडे-पुनावळे येथील 67 सोसायटी यांनी भाग घेतला आहे. या सजावट स्पर्धेसाठी व त्याच्या परीक्षणासाठी प्रत्येक सोसायटीतील गणेशोत्सवाला भेट दिली जात आहे. विशेष म्हणजे, भेट देणाऱ्या प्रत्येक सोसायटीमध्ये भेटवस्तूही दिली जात आहे. त्यामुळे सोसायटीधारकांमधून या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा चे कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे व त्यांचे परीक्षण टीम या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन परीक्षण करत आहेत. या स्पर्धेसाठी मिळालेला प्रतिसाद बघता पुढच्या वर्षीही ही स्पर्धा अशीच चालू ठेवणार आहेत आणि शक्य झाल्यास घरगुती गणपती सजावट स्पर्धा ही आयोजित करण्याचे मानस आहे, अशी माहिती ताम्हाणे यांनी दिली.

सोसायटीधारकांचा गणेशोत्सव दिशादर्शक…
विविध सोसायटीमध्ये जाऊन एक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील जवळपास सर्वच स्तरातील सोसायटी धारकांनी स्पर्धेचे कौतुक केले व सहभाग घेतला प्रत्येक सोसायटीमध्ये कोणता ना कोणता सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न देखाव्या मार्फत हलता देखावा असो, जिवंत देखावा असो किंवा पोस्टरच्या माध्यमातून असो एक नवीन संदेश या सोसायटी धारकांनी समाजासाठी दिला आहे हे बघून आपण जे स्पर्धा घेतली आहे ती सार्थक ठरल्याचे आम्हाला वाटत आहे, अशा भावना तुषार ताम्हाणे यांनी व्यक्त केल्या आहेत.






