पिंपळे सौदागरमध्ये भरणार सहकार दरबार !
गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनपर मेळावा
पिंपरी : पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ पिंपळे सौदागर विभागाच्या वतीने “अमृतमहोत्सवी सहकार दरबार” आयोजित करण्यात आला आहे.या निमित्ताने पिंपळे सौदागर मधील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनपर मेळावा देखील पार पडणार आहे.
पिंपळे सौदागर येथील हॉटेल शिवार गार्डन, शिवार चौक येथे सहकार दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार शंकर जगताप, पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, पुण्याचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थेच्या सचिव मनीषा कोष्टी, उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
सहकार दरबारच्या निमित्ताने पिंपळे सौदागर मधील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनपर मेळावा आयोजित केला आहे.