PCMC News : प्रभागनिहाय कोविड दक्षता समित्या, 50 बेडचे वार्ड कोविड सेंटर सुरू करणार
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका वॉर्ड स्तरावर मायक्रो नियोजन करत आहे. महापालिकेच्या 32 प्रभागात कोविड दक्षत्या समित्या, 32 प्रभागात 50 बेडचे वॉर्ड कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोना टेस्टींग सेंटर, फिव्हर क्लिनिक, क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रुम उभारण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणूचा परिरोध (प्रतिबंध) करुन वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका स्तरावर युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. COVID-१९ चा प्रादुर्भाव/संक्रमण रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी कोरोना आजाराच्या साथीचा प्रतिबंध/उपायोजना करण्यासाठी यापुर्वीच्या दोन लाटांचा पुर्वानुभव विचारात घेता यापुढील नजीकच्या काळात तिस-या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्यासाठी, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत असलेल्या 4 वॉर्डमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 4 “कोविड दक्षता समित्या” (CVC) स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये स्थानिक नगरसदस्य, क्षेत्रीय अधिकारी, संबधित रुग्णालय प्रमुख किंवा वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, त्याभागातील NGO व व्यापारी संघटनेचा प्रतिनिधी यांचा समावेश राहील.





