Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणाला दगडाने मारहाण करणार्‍या दोघांवर गुन्‍हा

चाकण : तरुणाला दगडाने बेदम मारहाण करण्‍यात आली. याप्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना महाळुंगे येथे रविवारी सकसाळी अकरा वाजताच्‍या सुमारास घडली. अजित शरद वारकड (वय २६, रा. म्हाडा सोसायटी, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ अरुण कदम (वय ४०) आणि राजश्री सोमनाथ कदम (वय ३५, दोघेही रा. म्हाडा सोसायटी, महाळुंगे, ता. खेड, जि.पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा –  चाकणमध्ये टेम्‍पोने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी अजित वारकड हे नष्टा करण्याकरिता वाय कॉर्नर, महाळुंगे येथे जात होते. ते म्हाडा बिल्डींगच्या समोर आले असता त्यांच्‍या बिल्डींगमध्ये रहाणारा आरोपी सोमनाथ कदम हा जोरात मोटार सायकल फिर्यादीचे अंगावर घेवुन आला. त्‍यामुळे फिर्यादी यांनी त्याला विचारले तु असे का करतो, तेव्हा आरोपी सोमनाथ याने फिर्यादी वारकड यांना शिवीगाळी केली. त्‍यावेळी त्‍यांच्‍यात झटापट झाली. त्यावेळी महिला आरोपी राजश्री कदम ही तेथे आली. तिने फिर्यादी यांचे दोन्ही हात पकडून धरले व आरोपी सोमनाथ याने तेथे पडलेला दगड हातात उचलुन फिर्यादीचे डोक्यात, डाव्या कानाचे वरती मारुन दुखापत केली. तसेच आमच्‍या नादी लागला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button