Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चाकणमध्ये टेम्‍पोने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

चाकण : भरधाव वेगातील टेम्‍पोने दिलेल्‍या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्‍यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर रविवारी (दि. २६) पहाटे चाकण येथे घडली. सामित्र सनप्पा बसलिंगअप्पा चिंतामणी (वय २४, रा. आंबेठाण चौक, चाकण) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. महंतेश रामप्पा रंगापुरे (वय २२, रा.अधिराज नक्षत बिर्ल्डींग, आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मारुती सुजुकी कॅरी सुपर या टेम्‍पोवरील चालक काशिनाथ सिद्राम (रा. भारतमाता चौक चाकण) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा –  चिखली परिसरात दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्‍हा

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नाशिक- पुणे रोडवर चाकणमधील स्वामी कार डेकोर समोर भारतमाता चौक, चाकण येथे नाशिक कडून येणाऱ्या मोटार सायकलला चाकण कडून नाशिककडे रॉग साइटने येणार्‍या आरोपी चालवत असलेल्‍या टेम्‍पोने जोरदार धडक दिली. या अपघातात सामित्र याचा मृत्‍यू झाला. तर सर्वेशनाथ शशिकांत यादव (वय २२, रा. आंबेठाण चौक, चाकण) हा गंभीर जखमी झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button