तुरटीच्या पाण्याने केस स्वच्छ केल्यास केस गळतीची समस्या कमी
हिवाळ्यात अनेक लोकांन केस गळण्याची समस्या
मुंबई : केस गळण्याच्या समस्येची अनेक कारणे आहेत, जसे की पोषणाची कमतरता, अनुवांशिक कारणे आणि औषधांचे दुष्परिणाम. त्याचप्रमाणे बदलत्या हवामानामुळे हिवाळ्यातही केस गळतीची समस्या वाढू शकते.
हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा वाढतो आणि नैसर्गिक आर्द्रतेच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊ लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ऑइल, शॅम्पू आणि सिरम वापरूनही ही समस्या दूर होत नाही. हिवाळ्यात केसांची वाढ देखील थांबते, ज्यामुळे बऱ्याच वेळा केस कापण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही.
नैसर्गिक गोष्टी केसांना लावल्याने केसांसंबंधित या समस्या कमी होऊ शकतात. तुरटी ही अशीच एक गोष्ट आहे जी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. तुरटीच्या पाण्याने केस स्वच्छ केल्यास केसगळतीची समस्या कमी होते.
तुरटीने केस धुण्याची पद्धत
हिवाळ्यात टाळू आणि केस स्वच्छ करण्यासाठी तुरटीचे पाणी वापरू शकता. तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तुरटीच्या पाण्याने शॅम्पू करू शकता. यामुळे केस निरोगी आणि मजबुत होतील.
हेही वाचा – ‘सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार’; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
पुढील प्रकारे करा वापर
एका मोठ्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी घ्या. त्यात एक चमचा तुरटी पावडर घाला.
त्यानंतर या पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि त्यात ३-४ चमचे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट घाला.
या मिश्रणात तुम्ही २ चमचे कॉफी पावडरही घालू शकता. चांगले मिसळा.
नंतर या मिश्रणात अर्धा किंवा एक चमचा शॅम्पू घाला.
जेव्हाही केसांना शॅम्पू करायचे असेल तेव्हा हे मिश्रण वापरा. तुरटीच्या पाण्याने टाळूला मसाज करा आणि नंतर त्याच मिश्रणाने केसांना मसाज करा.
हे मिश्रण केसांवर आणि टाळूवर 5-10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर, आपले डोके शॅम्पू आणि पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा.
तुरटी वापरण्याचे फायदे
केसगळतीची समस्या कमी करण्यासोबतच तुरटीच्या पाण्याने केस आणि डोके स्वच्छ केल्याने टाळू निरोगी राहते आणि केसांना नवीन चमक येते.
ज्या लोकांच्या केसांची वाढ मंदावली आहे, त्यांनी तुरटीच्या पाण्याने केस धुवावे. केसांची वाढ चांगली होते.
हिवाळ्यात कोंड्याची समस्या असणाऱ्यांनी तुरटीच्या पाण्याने केस धुवावेत. तुरटीमधील अँटी-बॅक्टेरियल घटक टाळूला निरोगी बनवतात.
तुरटीचे पाणी केसांना मऊ आणि मजबुत बनवते.





