ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीमध्ये डक्टमध्ये तिघांचा मृत्यू प्रकरणात बीएसएनएल कर्मचारी अटकेत

कामगारांना मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट किंवा श्वसन उपकरणे मिळाली नाही

पिंपरी-चिंचवड : निगडी प्राधिकरणातील प्लॉट नं. ६, सेक्टर नं. २७, निर्मल व्हिला समोर बीएसएनएलच्या डक्टमध्ये काम करत असताना तिघा कामगारांचा श्वास घुटमळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बीएसएनएलचा संबंधित कर्मचारी रमेश शिवाजी पाटील (वय ४६) याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. बीएसएनएलच्या डक्टमधून ऑप्टिकल फायबर पॉईंट काढण्याचे काम सुरू होते. आरोपी रमेश पाटील याने या कामासाठी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना न करता चार मजुरांना कामावर पाठवले होते. हे डक्ट दीर्घकाळापासून बंद अवस्थेत असल्याची माहिती असूनदेखील, कामगारांना मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट किंवा श्वसन उपकरणे न देता त्यांना आत पाठवण्यात आले.

हेही वाचा     :      “कृष्ण विरुद्ध सुदर्शन: उपराष्ट्रपतीपदाची दक्षिणात्य लढत” 

या कामासाठी प्रशिक्षित स्प्लायसर असणे आवश्यक असतानाही, आरोपीने अशिक्षित व असुरक्षित अवस्थेतील १) दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे, २) लखन ऊर्फ संदीप आशरुबा धावरे आणि ३) साहेबराव संभाजी गिरशेट यांना डक्टमध्ये उतरवले. आत उतरल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. चौथा कामगार बाबासाहेब वाघ बचावला आहे.

पोलिस निरीक्षक भोजराज विष्णु मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निगडी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. (बी.एन.एस.) कलम १०५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३७३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी रमेश पाटीलला अटक करण्यात आली असून, बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही तपास सुरू आहे. हादरवून टाकणारी ही घटना कामगारांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणत आहे. अशा दुर्लक्षामुळे तिन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button