नवीन आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांकडे ८७ कोटींचा कर येणे बाकी!
करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करण्याचे आवाहन...

पिंपरी-चिंचवड : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या प्रत्येक मालमत्तेच्या मालमत्ताधारकांना महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतूदीनुसार विशेष नोटीस देणेत येऊन आज अखेर ८९,००६ नवीन मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे अंतिम बिल प्रथमच वाटप केले असून या मालमत्तांची रुपये १६७ कोटी कराची मागणी निश्चिती कार्यवाही सुध्दा पूर्ण झाली आहे.
यापैकी आत्तापर्यंत ४७ हजार ४४८ मालमत्ताधारकांनी ७७ कोटीं कराचा भरणा महानगरपालिकेकडे केला आहे. त्याचबरोबर, ४१,५५८ मालमत्तांधारकांकडे अद्यापही ८७ कोटींचा कर येणे बाकी आहे. त्यांची करवसुली त्यांना एसएमएस, फोन, टेलिकॉलिंग करुन कार्यवाही सुरु आहे. मालमत्ता सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या नव्या मालमत्तांची आकारणी झालेली आहे अशा मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ताकराचा तत्काळ भरणा करावा. असे आवाहन करंसकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत 2028 पर्यंत पूर्ण होणार
ज्या मालमत्तांची चालू वर्षी नव्याने आकारणी झाली आहे, अशा मालमत्तांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. आत्तापर्यंत ३०,४४० मालमत्ताधारकांनी मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेतला आहे. सवलतीमध्ये ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के, झिरो वेस्ट आणि ‘एसटीपी प्लॅंट’ कार्यान्वित असल्यास १० टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामळे ज्या मालमत्ताधारकांना माहे जानेवारी पासून मालमत्ता कराचे प्रथमच बिल मिळाले आहे अशा मालमत्तांना मालमत्ताकरावर विविध सवलती असून मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वीच मालमत्ताधारकांनी कर भरुन सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे. सबब ज्या ज्या मालमत्ताधारकांना महानगरपालिकेकडून कर महानगरपालिकेस जमा करणेसंदर्भात फोन येत आहे त्या फोनचा आदर करुन आपला कर महानगरपालिकेकडे ३१ मार्च २०२५ पुर्वी जमा करावा. असेही आवाहन केले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नवीन आकारणी झालेल्या मालमत्तांना बिलांचे वाटपसुध्दा करण्यात आले आहे. सदर मालमत्ताधारकाकडे तब्बल ८७ कोटींचा कर येणे बाकी असून यापैकी काही मालमत्ता सवलतीस पात्र आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांचा काळ पूर्ण झालेला नाही अशा मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करुन सवलतींचा लाभ घ्यावा.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
नव्याने आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा ऑनलाइन स्वरुपात भरणा करुन त्यावरील विविवि सवलतींचा लाभ घ्यावा. शहरातील नव्याने आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वीच चालूवर्षाचा कर भरुन आपली मालमत्ता थकबाकीदारांच्या यादीमध्ये न येण्यापासून टाळावी. त्यासोबतच ज्या मालमत्ताधारकांनी आपले बिल मिळण्यासाठी विशेष नोटीस स्वीकारल्यानंर आवश्यक कागदपत्रांची पुर्तताकरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करुन मालमत्ताकराचे बिल उपलब्ध करुन घ्यावे.
– प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका