Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दिशाच्या वडिलांची याचिका हायकोर्टाने स्वीकारली; २ एप्रिलला होणार सुनावणी

मुंबई : दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घडामोडीवर आता बुधवार २ एप्रिल २०२५ रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचे वृत्त ‘ANI’ने दिले आहे.

दिवंगत दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. सतीश सालियन यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने रिट याचिकेची प्रत समीर वानखेडे यांना दिली आहे. समीर वानखेडे यांचे वकील फैजान मर्चंट यांनी सांगितले आहे की, त्यांचे अशिला उच्च न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत, ज्यामध्ये त्यांच्या अशिलांसंबंधीच्या सर्व मुद्द्यांची उत्तरे दिली जातील, असे देखील ‘ANI’ने वृत्तात म्हटले आहे.

दिशा तिच्या करिअरप्रती खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणे शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असे मला त्यावेळी भासवण्यात आले. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं सतत रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवले होते. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती.

हेही वाचा –  नवीन आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांकडे ८७ कोटींचा कर येणे बाकी!

मुंबई पोलिसांनी दिशाचा सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोरिया ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला, असं सतीश सालियन यांनी म्हटले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृत्य सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. 28 वर्षीय दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचे अंतर होते. 8 आणि 9 जून 2020 च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिशाचा एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या दोघांच्या मृत्यूचा संदर्भ अनेकांनी जोडला. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टमसाठी वेळ जाणूनबुजून लावण्यात आला का असा सवालही उपस्थित करण्यात आला.

8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी सुरु होती. या पार्टीत दिशाचा होणारा नवरा रोहन राय आणि जवळची मंडळी उपस्थित होती. थोड्याच वेळात अचानक या ठिकाणी आलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींमुळे वातावरण बदलले, असे बोलले जात आहे. या हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये तत्कालिनमंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांचा समावेश होता असे सांगितले जात आहे. दिशा सालियनवर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीतून समोर आल्या आहेत. दिशाचे तोंड बंद करण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button