Breaking-newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, थेरगावची शालेय क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी

शिक्षण विश्व: जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ५ पदकांची कमाई

पिंपरी-चिंचवड : सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, थेरगाव शाळेने आपली चमकदार उपस्थिती नोंदवली आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही शाळेने भक्कम पाऊल टाकत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत एक रोप्य आणि चार कास्यपदकांची कमाई करत शानदार यश संपादन केले.

या स्पर्धेत पृथ्वी रोडे हिने रोप्य पदक पटकावले. तर श्याम माळी, धनराज जाधव, असावरी राऊत आणि भाग्यश्री गायकवाड यांनी अनुक्रमे कास्यपदके जिंकत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. शाळेतील विद्यार्थी केवळ बॉक्सिंगपुरतेच मर्यादित न राहता जुडो, युनिफाईट, किक बॉक्सिंग, थाई बॉक्सिंग, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, डॉजबॉल यांसारख्या विविध खेळांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. खेळाप्रती असलेली विद्यार्थ्यांची निष्ठा आणि संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रीय स्तरावरील माजी खेळाडू श्री. विजय पवार सर यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचे प्रदर्शन सातत्याने उंचावत आहे. याच मार्गदर्शनाचा लाभ घेत आजवर अनेक विद्यार्थी विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवू शकले आहेत.

या यशानंतर विजेत्या तसेच सहभागी सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार, सचिव श्री. अशोक मोरे, खजिनदार सौ. सुरेखा पवार, मुख्याध्यापिका सौ. विद्या नाईक, सौ. अग्निस मॅडम, सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. यशवंत माने यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असून त्यांच्या मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांच्या यशातून दिसून येत आहे.

राष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन…

न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, थेरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार सर सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन देत असतात. स्वतः राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेल्या पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चिकाटी आणि जिद्द विकसित होत आहे. त्यांच्याच प्रेरणेतून अनेक विद्यार्थ्यांनी विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. त्याचबरोबर क्रीडा शिक्षक श्री. यशवंत माने यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत मोलाचे ठरत आहे. सरांचा खेळातील अनुभव, सराव पद्धती आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची शैली यामुळे शाळेतील खेळाडूंना एक भक्कम पाठबळ मिळते आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button