”एआय”च्या प्रगत अभ्यासक्रमांसाठी पुढाकाराची गरज
शिक्षण विश्व: 'होणहार भारत 2025 कॉन्क्लेव्ह'मधील तज्ञांचा सुर

पिंपरी : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रगत अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्रातील संशोधकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे मत कुलपती डॉ. विजय डी पाटील यांनी व्यक्त केले.
मावळ, आंबी येथील डॉ .डी वाय पाटील विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्रज्ञान नेतृत्वावर लक्ष केंद्रित करून तिसऱ्या ‘होणहार भारत 2025 कॉन्क्लेव्ह’चे आयोजन केले. सीएक्सओ कनेक्टच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचा उद्देश हा एआयचे भविष्य आणि विविध क्षेत्रांवर त्याचा परिवर्तनीय परिणाम शोधण्यासाठी विचारवंत नेते, उद्योग तज्ञ आणि व्यावसायिक यांच्याशी संवाद साधने हा होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानावर आधारित विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्रातील संशोधकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असा सल्ला कुलपती डॉ. विजय डी पाटील यांनी दिला.
हेही वाचा – भोसरीतील गुडविल चौकात महापालिकेने जपली स्वच्छतेबरोबर सुंदरता..!
या चर्चा सत्रात कुलगुरू प्रा. डॉ. सायली गणकर , रोकेट अँड सीएक्सओ कनेक्स्टचे संस्थापक आणि सीईओ नीलेश धनानी, एक्सएम एक्सलन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ विनायक गपचुप, ईटीसीच्या टॅलेंट डेव्हलपमेंट संचालक प्रीती आहुजा, बिर्लासॉफ्टचे फायनान्स व्हाईस प्रेसींडेट दयाश आगंळे, इन्व्होकएचआरचे सह-संस्थापक अपूर्व चौबे, एक्समॅटर्सचे संचालक अरपण सरकार, बिर्लासॉफ्टचे सीआयओ आणि आयटी प्रमुख आनंद कुमार सिन्हा आणि टेराब्लू क्लायमेट टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ प्रदीप मोटवानी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात लॉ स्कूलच्या डॉ. रोहन दास यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूशनचे प्रमुख डॉ. प्रणव रंजन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कौशल्य विकासाची तज्ञांनी व्यक्त केली गरज
परिषदेने उद्योजकांना नवोन्मेष आणि तांत्रिक प्रगतीच्या वाढत्या गरजांबद्दल , उद्योगांना आकार देण्यात एआयची भूमिका आणि तंत्रज्ञान नेतृत्वाचे भविष्य , वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे राहण्यासाठी कौशल्य वाढवणे, सतत शिक्षण आणि विकासाचे महत्त्व उद्योग तज्ञांनी अधोरेखित केले.विद्यापीठात एआयसीटीई संचालित इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. चर्चा सत्रात दोन प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली