Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

डी. के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! ३ जून रोजी होणार भव्य शपथविधी सोहळा

बेंगळुरू | कर्नाटकच्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) बैठकीत ६४ वर्षीय शिवकुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्री म्हणून शिवकुमार यांचा शपथविधी येत्या बुधवारी, ३ जून रोजी दुपारी ४:०० वाजता लोकभवन येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात त्यांच्यासोबत काही नवनियुक्त मंत्रीही शपथ घेणार आहेत.

विधान सौध येथे काँग्रेस आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला हे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीत मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर ज्येष्ठ नेते जी. परमेश्वरा यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. पक्षाच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी या प्रस्तावाला एकमुखाने पाठिंबा दिला. यानंतर पक्षश्रेष्ठींशी अंतिम चर्चा करून शिवकुमार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

हेही वाचा

आरसीबी इतिहास रचणार की गुजरात बाजी मारणार? आयपीएल २०२६ च्या विजेतेपदासाठी आज रंगणार हायव्होल्टेज मुकाबला

राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा सादर

नेतेपदी निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी तातडीने लोकभवन येथे जाऊन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा अधिकृत दावा सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले आणि आभार मानले.

“मी कर्नाटकच्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी माझी एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्व आमदारांचा आणि पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे.”

– डी. के. शिवकुमार (कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री).

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button