Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यात शुल्कात मोठी कपात

Fuel Export Duty Cut on Petrol Diesel Price | पश्चिम आशियातील (मध्य पूर्व) सततच्या तणावपूर्ण आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने देशातील पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील (ATF) निर्यात शुल्कात (विंडफॉल टॅक्स) मोठी कपात जाहीर केली आहे. सुधारित करांचे हे नवीन दर उद्या म्हणजेच १ जूनपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींचा आढावा घेतल्यानंतर वित्त मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, या कपातीमुळे देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नसून सामान्यांसाठी दर स्थिर राहणार आहेत.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) प्रति लीटर ३ रुपयांवरून कमी करून १.५ रुपये करण्यात आले आहे. तसेच डिझेलवरील शुल्क प्रति लीटर १६.५ रुपयांवरून १३.५ रुपये, तर जेट इंधनावरील (ATF) निर्यात शुल्क प्रति लीटर १६ रुपयांवरून ९.५ रुपये निश्चित करण्यात आले आहे.

देशांतर्गत किमतींवर परिणाम नाही

नुकतीच देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या किमतींमध्ये दरवाढ झाली असल्याने, या सुधारणेचा देशांतर्गत दरांवर कोणताही परिणाम होणार नाही. देशांतर्गत वापरासाठी काढण्यात येणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या उत्पादन शुल्काच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सरकारी नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

पुणे विषारी दारू प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजन यांची भेट

काय आहे ‘विंडफॉल टॅक्स’ आणि तो का लावला जातो?

जेव्हा एखाद्या विशिष्ट किंवा अपवादात्मक परिस्थितीमुळे तेल कंपन्यांना अनपेक्षितपणे प्रचंड किंवा असामान्य नफा (Windfall Gains) होतो, तेव्हा सरकार त्यांच्यावर हा विशेष कर लावते. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे आखाती देशांतील इंधन पुरवठा साखळीत प्रचंड अडथळे निर्माण झाले आहेत. बहुतांश जहाजांसाठी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ अजूनही बंद आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक पातळीवर वाढलेल्या किमतींचा देशांतर्गत निर्यातदारांनी अवाजवी फायदा घेऊ नये आणि देशात इंधनाचा तुटवडा भासू नये, म्हणून सरकारने हे शुल्क लागू केले होते.

सरकार दर पंधरवड्याला या दरांचा आढावा घेते. यापूर्वी १६ मे रोजी सरकारने पेट्रोलवर प्रति लीटर ३ रुपये विंडफॉल टॅक्स लावला होता, तर डिझेलवर तो १६.५ रुपये आणि एटीएफवर १६ रुपये करण्यात आला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यातील युद्धजन्य परिस्थितीनुसार या करांमध्ये वेळोवेळी वाढ आणि घट करण्यात आली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने पुन्हा एकदा या करांमध्ये कपात केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button