मिशन-PCMC: पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का!
माजी नगरसेवक प्रवीण भालेकर आता भाजपामध्ये प्रवेश करणार
पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पहिला धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
भालेकर यांच्या निर्णयामागील मुख्य कारण म्हणून स्थानिक पातळीवरील नगरसेवकाच्या मक्तेदारीमुळे पक्षातील कामकाजावर प्रभाव पडत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवीण भालेकर म्हणाले, “स्थानिक पातळीवरील राजकारणात पक्षातीलच एका नगरसेवकाची वाढती मक्तेदारी आणि कार्यशैली यामुळे मी त्रस्त झालो होतो. नागरिकांच्या कामांना योग्य न्याय मिळत नव्हता. त्यामुळे विकासाला प्राधान्य देत आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
हेही वाचा : सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसादाची अपेक्षा
भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भालेकर भाजपमध्ये सक्रिय काम करणार आहेत. या प्रवेशामुळे प्रभागातील तसेच शहरातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपमध्ये प्रवेशानंतर भालेकर आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी नवीन राजकीय दिशा आखतील.
यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा आणि प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या घटनाक्रमावर प्रतिक्रिया देत सांगितले की, “पक्ष सोडल्याने आम्हाला निश्चितच धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अंतर्गत कलह सार्वजनिक होत असल्याचे दिसून येते.”
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“स्थानिक राजकारणात पक्षातील मक्तेदारी आणि कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे हित योग्य प्रकारे साधता येत नव्हते. विकासाला प्राधान्य देत मी आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.”
– प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक.





