मिशन-PCMC : परभणीकरांचा महाविकास आघाडीला पाठिंबा!
परभणीचे खासदार संजय जाधव यांचा पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरातील नागरिकांशी संवाद

पिंपरी-चिंचवड : महाविकास आघाडीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.
परभणी आणि परिसरातील अनेक पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरात वास्तव्याला आहेत. अनेक वर्षांपासून नागरिक या परिसरात स्थायिक आहेत. खासदार जाधव हे शहरात आले असता त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला.
हेही वाचा – दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

जाधव म्हणाले, अलीकडेच मराठवाडा आणि सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली. त्यामुळे आम्हा परभणीकरांना महाविकास आघाडीकडून विश्वास वाटतो. परभणीकर आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नक्कीच साथ देतील असा विश्वास खासदार जाधव यांनी व्यक्त केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
खासदार जाधव यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्या संवादामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
– तुषार कामठे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.




