वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींकडून खास शुभेच्छा, म्हणाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. त्या वादातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही त्यांनी हजेरी लावली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा पुढे आपली वेगळी ताकद निर्माण करणाऱ्याच्या प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबतही शिष्टाई करत युती केली. या त्यांच्या सगळ्या राजकीय कौशल्याचे कौतुक याआधीही झाले आहे. आता त्यांच्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणीस हे धडाडीचे नेते आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.






