आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक निखिल बोऱ्हाडे यांच्यामुळे ३६५ जणांना नोकरी!
नोकरी महोत्सवात ६१० युवकांचा सहभाग
पिंपरी : मोशी भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक निखिल बोऱ्हाडे यांच्यावतीने आयोजित भव्य नोकरी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे अनेक होतकरू तरुण-तरुणी महिला, उच्चशिक्षित, व कमी उच्चशिक्षित लोक नोकरीच्या शोधात असतात याच पार्श्वभूमीवर निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आयोजित नोकरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी 610 होतकरूंनी यात सहभाग घेतला होता, यापैकी 365 जणांना नोकरी मिळाली आहे, तर 142 जणांना ऑन द स्पॉट ऑफर लेटर आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल दादा जाधव, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसेवक माऊली जाधव, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पार्टीच्या सोनमताई जांभुळकर यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले.
यावेळी परिसरातील व पिंपरी चिंचवड शहरातील 40 कंपन्या सहभागी झाल्या होत्या, सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांनी कंपनीच्या सर्व मंडळीचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला व ते म्हणाले की, निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामुळे फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मी ऋणी राहील, नोकरी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन हे अचानक पणे करण्यात आले त्यामुळे खूप कमी वेळ मिळाला, नोकरी महोत्सवात नोकरी लागलेल्या सर्वांचे अभिनंदन करत ते म्हणाले की, भविष्यात आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशीतील सर्वात मोठा नोकरी महोत्सव आपण येत्या काळात घेऊ असे सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे म्हणाले.





