क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या २१ खेळाडूंची भारतीय संघात निवड

महापौर रवि लांडगे यांनी केले अभिनंदन; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा

पिंपरी | जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाची निवड करण्यात आली असून १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल २१ खेळाडूंची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

भारतीय संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूंमध्ये आदर्श केकंड, आदित्य टेळेकर, आनंद गायकवाड, अनन्या हेलावे, अथर्व कर्हाडे, देवराज भुटेकर, हर्षल धाने, काशिनाथ हेवळे, प्रिया सैनी, राज वायकोळे, ऋतुजा कुलकर्णी, साक्षी सैनी, श्रेया दांडे, सिद्धार्थ चौधरी, सूरज बांगर, सूरज टाळेकर, वैदेही नवले, वेदांत तापकीर, विश्वजीत पवार, यश बलगुडे आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा

लिओनेल मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

सिलंबम ही भारतातील प्राचीन पारंपरिक युद्धकला असून तिच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील या खेळाडूंनी कठोर परिश्रम, शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत भारतीय संघात स्थान मिळविले आहे.

या निवडीमुळे केवळ खेळाडूंचाच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहराचाही गौरव झाला असून पारंपरिक भारतीय क्रीडा आणि युद्धकलेच्या क्षेत्रातील शहराचे योगदान अधोरेखित झाले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांची निवड ही त्यांच्या कठोर परिश्रमांची, शिस्तीची आणि समर्पणाची पावती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना ते निश्चितच देशाचा आणि शहराचा गौरव वाढवतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या उज्ज्वल कामगिरीसाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button