एम. एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा उज्वल निकालाची परंपरा कायम
शिक्षण विश्व : दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकालाची नोंद; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील मोरया शिक्षण संस्थेच्या एम. एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षा २०२५-२६ मध्ये यंदाही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाने सर्व शाखांमध्ये 100 टक्के निकालाची नोंद करत शैक्षणिक उत्कृष्टतेचा ठसा उमटवला आहे.
इयत्ता दहावी परीक्षेसाठी एकूण 188 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने 100 टक्के निकाल प्राप्त केला आहे. यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या 23 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावी परीक्षेत कु. कस्तुरी कुलकर्णी हिने 99 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. कस्तुरी गायकवाड हिने 97.20 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर कु. वरदा टिकोळे हिने 97 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकूण 134 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 40 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 97.91 टक्के तर कला शाखेचा 91.66 टक्के निकाल लागला आहे.
हेही वाचा – ‘पीसीसीओई’मध्ये ‘के-नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना

बारावी विज्ञान शाखेत कुमार अथर्व कुदळे याने 86.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, कु. भक्ती गव्हाणे हिने 85.33 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर कुमार अर्घ्य पाठक याने 84.83 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत कुमार रोहन राजभर (79.33 टक्के) प्रथम, कु. हर्षिता घाडगे (77.83 टक्के) द्वितीय, तर कु. श्रेयश जकापुरे व अमेय कुलकर्णी (74.50 टक्के) यांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेत कु. हिरण्या मंडुसकर हिने 83.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयातून विज्ञान शाखेत 75, वाणिज्य शाखेत 47 तर कला शाखेत 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार गौरव..!
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. स्वप्निल शेडगे, कार्यवाह तथा प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर आणि खजिनदार तथा तहहयात विश्वस्त श्री. रणजीत सावंत यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांनी घेतलेल्या जादा तासिका, सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन व नियमित मूल्यमापन यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून उत्तम निकाल साध्य झाल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





