Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

शिक्षण विश्व: ज्ञानसाधणेसाठी विश्वासार्ह नाव ‘‘प्रियदर्शनी’’

प्रियांदर्शनी इंटरनॅशनल प्री-स्कूल, आळंदी खेड तालुक्यातील एकमेव नोंदणीकृत प्री-स्कूल

पुणे : खेड तालुक्यातील सुमारे ५० हून अधिक शाळांमध्ये कार्यरत असताना, प्रियदर्शनी इंटरनॅशनल प्री-स्कूल, आळंदी ही एकमेव नोंदणीकृत प्री-स्कूल म्हणून ठळकपणे आपली ओळख निर्माण करत आहे. केवळ मान्यता नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाधारित अभ्यासक्रम, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला जात आहे.

गुणवत्तेची खात्री – नोंदणीकृत प्री-स्कूलचा दर्जा

नोंदणीसिद्ध दर्जा मिळवणे ही केवळ एक औपचारिकता नसून, हे आमच्या शिक्षणपद्धतीतील शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. प्रियदर्शनी इंटरनॅशनल प्री-स्कूल हे खेड तालुक्यातील एकमेव अधिकृत प्री-स्कूल असल्याचा अभिमान संस्थेला वाटतो.

शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवकल्पनांचे शिक्षण

या शाळेचा अभ्यासक्रम Early Childhood Association (ECA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आलेला असून, शिक्षण हे अनुभवाधारित, आनंददायी व सर्जनशीलतेला चालना देणारे ठेवले गेले आहे. शाळेचे शिक्षक आणि प्राचार्य डॉ. स्वाती पॉपट यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण घेतात. त्यामुळे शिक्षकांचे ज्ञान सतत अद्ययावत राहत असून विद्यार्थ्यांना आधुनिक व जागतिक दर्जाचे शिक्षण मिळते.

बालकेंद्रित आणि अभिनव इन्फ्रास्ट्रक्चर…

प्रियांदर्शनी प्री-स्कूलचे भौतिक रचना पूर्णपणे लहान मुलांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. खुली वर्गरचना जेथे मुलांना मोकळेपणाने शिकता व हालचाल करता येते. विविध प्रकारचे स्पर्शात्मक (टॅक्टाइल) पृष्ठभाग, मुलांसाठी वैयक्तिक एकांताचे जागा, घुमटाकृती छतातून मिळणारा नैसर्गिक प्रकाश, लक्षवेधक, आनंददायी रंगसंगती, हे सर्व घटक मुलांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास अधिक सुस्पष्टपणे घडवतात.

हेही वाचा –  पालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर

तंत्रज्ञान आणि पारंपरिक मूल्यांचा समतोल…

प्रियदर्शनी प्री-स्कूलने आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार करत AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. मुंबईमधील अनुभवी IB शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वाचन व लेखन कौशल्ये शिकवतात. या हायब्रीड शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण अधिक प्रभावी, व्यक्तिगत आणि आनंददायी बनते. संज्ञानात्मक आणि मोटर कौशल्यांच्या विकासावर, सेन्सरी समज वाढविण्यावर भर, सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यावर भर, पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे
आयोजन केले जाते.

का निवडाल प्रियांदर्शनी इंटरनॅशनल प्री-स्कूल?

1. खेड तालुक्यातील एकमेव नोंदणीकृत प्री-स्कूल
2. Early Childhood Association मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
3. डॉ. स्वाती पॉपट यांचे मार्गदर्शन
4. बालकेंद्रित, सुरक्षित आणि सर्जनशील परिसर
5. AI आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीचा समन्वय6. प्रत्येक मुलासाठी प्रेमळ, सुरक्षित आणि आनंदी शिक्षणाचा अनुभव.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button