Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खेळ रंगाला पैठणीचा : विनायक (आबा) मोरे यांचा सोसायटीनिहाय कार्यक्रम

  • साई श्रद्धा सोसायटीतील महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद
  • विनायक (आबा) मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्रीराम वरदायिनी सखी मंच

पिंपरी l प्रतिनिधी

मोरेवस्ती आणि चिखली परिसरातील महिलांना मनोरंजनाची पर्वणी मिळावी. यासाठी विनायक (आबा) मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्रीराम वरदायिनी सखी मंच यांच्या माध्यमातून ‘न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात येत आहे.

साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली परिसरातील पुरुष व महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सोसायटीतील महिलांनी कार्यक्रम अक्षरश: हाउसफूल्ल केला. या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ, तृतीय पारितोषिक जोडवी, चौथे पारितोषिक गॅस शेगडी, उत्तेजनार्थ पारितोषिक मिक्सर, कुकर, इस्त्री, पोळी डबा, तवा, टिफिन बॅग आणि इतर अनेक वस्तू देण्यात आल्या. खेळाचा आनंद घेत घरगुती वापराच्या उपयोगी वस्तू मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

  • महिलांचा संकल्प आम्ही आबांसोबत…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विनायक (आबा) मोरे यांच्यासोबत राहण्याचा संकल्प सोसायटीतील महिलांनी केला. विनायक (आबा) मोरे किंवा सोनम मोरे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार, असा निर्धार परिसरातील महिला-भगिनींनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button