ताज्या घडामोडीमनोरंजन

शिर्के कुटुंबाने चित्रपटात इतिहासाची विकृती केल्याचा आरोप

छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचे चित्रण

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 219 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या लढाई आणि औरंगजेबाने त्यांचे केलेले हाल याबद्दलचा इतिहास मांडण्यात आला आहे. यात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असे दाखवण्यात आले आहे. आता यावरुन गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दीपक शिर्के यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे, असा आरोप केला आहे. “छावा हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने चुकीचा, तोडमोड करुन, बदल करुन इतिहासात खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केला आहे. मी उत्तेकरांना जाहीर आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचे बदल करुन पुन्हा प्रकाशित करावा. अन्यथा तुमच्या गुन्हा नोंद करण्यात येईल. तुमच्यावर राजेशिर्के परिवाराकडून रोष व्यक्त करण्यात येईल”, असे दीपक शिर्के म्हणाले.

हेही वाचा  :  ‘आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ’; अभिनेते नाना पाटेकर 

अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही
“आम्ही राज्यभर आंदोलन उभ करणार आहोत. लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीची जे प्रकाशक आहेत, त्यांना नोटीस दिली आहे. याचे पुरावे दाखवा अशी नोटीस दिली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती की यावर तुमचं मत काय आहे. त्यांनी आमचा सल्ला घेतला गेला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावे, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही. त्यांनी चूक केली आहे”, असे दीपक शिर्के म्हणाले.

राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेल आहे
या चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे. जाणीवपूर्वक इतिहास बदलला आहे. आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे. षड्यंत्र करत बदनामी केली जात आहे. चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेल आहे. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, असा आरोप दीपक शिर्के यांनी केला.

सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास
छावा कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांची देखील आम्ही भेट घेतली होती. राजे शिर्के घराण्याचे खूप मोठं योगदान आहे. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. मग हे आरोप कसे केले जातात, इतिहास गायब केला जात आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही. मात्र खलनायक चुकीचा दाखवला आहे. गणोजी राजे शिर्के यांनी वाट दाखवली नाही. लक्ष्मण उतेकर यांनी चुकीचा इतिहास दाखवला आहे. सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला गेला, असा आरोप छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर शिर्के घराण्याने केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button