शिवसैनिकांचा अपमान झाल्यास जशास तसे उत्तर
पालकमंत्री शंभूराज देसाईंनी शिवेंद्रराजेंना डिवचले, दरवर्षी वाहून जाणारे डांबर हाच का जावलीचा विकास

पिंपरी चिंचवड : मेढा, कुडाळ, केळघर येणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीत शिवसैनिकांचा अपमान झाला तर जशास तसे उत्तर देऊ, असा दमदार इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जावळीचे विधानसभेचे आमदार मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता देत त्यांच्या मतदारसंघांमध्ये येऊन त्यांना डिवचले.
मेढा येथे शिवसेनेचा संवाद मिळावा आणि अंकुश कदम यांची संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार झाला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यानिमित्त महायुतीतील अंतर्गत
मेढा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अंकुश कदम यांचा सत्कार करताना पालकमंत्री शंभूराज देसाई, समवेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
तणाव जावळी तालुक्यात उफाळून आला. महायुतीत शिवसेनेचा दबदबा, अपमान सहन केला जाणार नाही असा इशाराच पालकमंत्र्यांनी दिला. संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी कुठे आहे जावलीचा विकास, विकास म्हणजे रस्ते आणि समाजमंदिरे होतो का? तालुक्यातील शेकडो मुले आज मुंबई पुण्यासारख्या
शहरात कामानिमित्त जाऊन तालुका ओस पडला आहे. या रस्त्यावर चालायला देखील माणूस नाही. या तालुक्यातल्या युवकांना रोजगार नाही, दरवर्षी वाहून जाणारे डांबर हाच तालुक्याचा विकास का? माझ्या तालुक्यातल्या भाबड्या लोकांसोबत सेल्फी काढायचा व पाच वर्षे सत्ता गाजवायची हे राजकारण बंद करा व युवकांच्या हाताला रोजगार मिळेल यासाठी संधी उपलब्ध करून द्या अन्यथा आम्हाला या तालुक्यातल्या सुपुत्राला या तालुक्यातल्या सुपुत्रांसाठी या जावलीत उतरावं लागेल, असा सज्जड इशाराच कदम यांनी देत नाव न घेता शिवेंद्रराजेंना डिवचले.
हेही वाचा – राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी अंशुमन धावडे याची निवड
स्वतः शिवेंद्रसिंहराजे कसे उत्तर देतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.
महायुती एकत्र आहे, एकजूट आहे, राज्यात केंद्रात शिवसेना शिंदे गट भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट असे प्रत्येक फलकावर तीन चिन्ह असतात मात्र मेढ्यातल्या शहरात भाजपवाले आमच्या कार्यकर्त्यांचे बॅनर लावू देत नाहीत, काढून घेतात, आमच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ देत नाही हे आता कदापिही सहन केले जाणार नाही. माझ्या शिवसैनिकांना कुठेही धक्का लागला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील जावळी तालुक्यातून तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा आणि त्यांच्या अस्तित्वावर जर कोणी उठत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देऊ
जावलीतील शिवसैनिकांमध्ये संचारले नवचैतन्य
जावली तालुक्यातील निवडणूक निरिक्षक म्हणून अंकुश बाबा कदम यांच्यावर जबाबदारी टाकली असून त्यांची निवड देखील करण्यात आली. त्यामुळे कार्यकत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. अंकुश कदम यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाने आता जावलीत शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येणाऱ्या काळात अंकुश कदम यांच्या नेतृत्वात जावली तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे.
आणि आम्ही शांत बसणार नाही, असे स्पष्ट शब्दांत देसाई यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमानिमित्त शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे त्याचबरोबर सातारा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, विकास शिंदे, सचिन करंजेकर, समीर गोळे, प्रशांत तरडे, संजय सुर्वे, सतीश पवार, श्रीरंग गलगले, गणेश निकम, त्यासह शेकडो पदाधिकारी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते.
भाजप व शिंदे गटात वाद पेटणार?
शिवसेनेच्या मेळाव्यातील त्या वक्तव्यामुळे जावळीतील राजकीय घडामोडी अचानकच चिघळल्या आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीचा नवा तक्ता तयार होत असताना हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. जावळीतील सत्ता समीकरणे पूर्वीसारखी सरळ राहतील, अशी शक्यताच उरलेली नाही. अनेक गावांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्याने धुरळा उडवला आहे. जावळीत महायुतीची परीक्षा आता खरी लागणार आहे. “महायुती आहे म्हणून शांत, पण शिवसेना आहे म्हणून सज्ज!” हा सवाल जावळीच्या राजकारणाला हादरे देत राहणार आहे.




