डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला दुहेरी मुकुट
शिक्षण विश्व: आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाची कमान

पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी या महाविद्यालयाने आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी विजेतेपद पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता.पुरुष विभागात महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर महिला विभागातही संघाने उत्कृष्ट रणनीती आणि एकजुटीच्या बळावर विजेतेपद मिळवले. दोन्ही संघांनी आपापल्या विभागात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा मान वाढवला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालथी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकाग्रता प्रेरणादायी आहे. दोन्ही संघांनी मिळवलेला दुहेरी मुकुट हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – शिवसैनिकांचा अपमान झाल्यास जशास तसे उत्तर
विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टी तेजस पाटील, कॅम्पस डायरेक्टर निवृत्त अमित विक्रम आणि डीन डॉ. एस. एस.सरनोबत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी कामगिरीत शारीरिक शिक्षण संचालक आबाजी माने यांचे मोलाचे योगदान राहिले. खेळाडूंना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यात खेळांसाठी रुची विकसित करणे यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजक समितीचेही अभिनंदन करण्यात आले.




