Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएलचा थरार संपला, आता टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय सामने; पाहा भारताचे २०२६ मधील संपूर्ण वेळापत्रक

India cricket Team schedule | दोन महिन्यांच्या थरारक आणि रंगतदार लढतींनंतर आयपीएल २०२६ हंगामाचा दिमाखात शेवट झाला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहासातील दुसरं आयपीएल विजेतेपद पटकावलं. आयपीएलचा हा थरार संपताच आता अवघ्या काही दिवसांतच टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रणांगणात उतरणार आहे. ६ जूनपासून न्यू चंदीगडमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय मालिकांना सुरुवात होत असून भारताचे पुढील वेळापत्रक अत्यंत व्यस्त असणार आहे.

आयपीएल संपून अवघ्या एका आठवड्यात भारतीय क्रिकेट संघ ६ ते २० जूनदरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात १ कसोटी आणि ३ एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका खेळणार आहे. मुल्लानपूर येथे होणारी एकमेव कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) चक्राचा भाग नसणार आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने यापुढील सर्व एकदिवसीय मालिकांना मोठे महत्त्व असणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिका २०२६: संपूर्ण वेळापत्रक

  • एकमेव कसोटी: ६ ते १० जून – न्यू चंदीगड
  • पहिला एकदिवसीय सामना: १३ जून – धर्मशाला
  • दुसरा एकदिवसीय सामना: १७ जून – लखनौ
  • तिसरा एकदिवसीय सामना: २० जून – चेन्नई

भारताचे आगामी क्रिकेट वेळापत्रक

  • ६ ते २० जून : अफगाणिस्तानचा भारत दौरा — १ कसोटी, ३ एकदिवसीय
  • २६ ते २८ जून : भारताचा आयर्लंड दौरा — २ टी-२० आंतरराष्ट्रीय
  • १ ते १९ जुलै : भारताचा इंग्लंड दौरा — ५ टी-२० आंतरराष्ट्रीय, ३ एकदिवसीय
  • २३ ते २६ जुलै : भारताचा झिम्बाब्वे दौरा — ३ टी-२० आंतरराष्ट्रीय
  • वेळापत्रक जाहीर व्हायचे आहे : भारताचा श्रीलंका दौरा — २ कसोटी
  • २७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर : वेस्ट इंडिजचा भारत दौरा — ३ एकदिवसीय, ५ टी-२० आंतरराष्ट्रीय
  • वेळापत्रक जाहीर व्हायचे आहे : भारताचा न्यूझीलंड दौरा — २ कसोटी, ३ एकदिवसीय, ५ टी-२० आंतरराष्ट्रीय
  • १३ ते २७ डिसेंबर : श्रीलंकेचा भारत दौरा — ३ एकदिवसीय, ३ टी-२० आंतरराष्ट्रीय

हेही वाचा

रॉयल ‘चॅम्पियन्स’ बंगळुरू! RCBच्या विजयाचा जल्लोष होणार, पण विजयी परेड निघणार का? महत्वाची माहिती समोर

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही फॉरमॅटमध्ये शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे.

भारताचा कसोटी संघ:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

भारताचा एकदिवसीय संघ:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button