राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी अंशुमन धावडे याची निवड
शिक्षण विश्व: गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सच्या गौरवात मानाचा तुरा

पिंपरी चिंचवड : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मोशी येथील इयत्ता अकरावीतील विद्यार्थी अंशुमन धावडे याची राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत अंशुमनने राज्यस्तरावर प्रवेश मिळवला असून त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
हेही वाचा – राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी अंशुमन धावडे याची निवड
संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी अंशुमनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील तसेच सर्व मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक आणि पालक यांनीही अंशुमनचे कौतुक केले.
अंशुमनने आपल्या दैनंदिन परिश्रम शिस्त यातून हे यश मिळवले असून हे विद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. असे कविता कडू पाटील म्हणाल्या.




