Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

म्हाडाचे फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक; आरोपी अटकेत

भोसरी : म्हाडाचे फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने नागरिकांची फसवणूक केली. हा प्रकार मागील अडीच वर्षांत भोसरी परिसरात घडला. आरोपी तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रतीक राजेश धाईंजे (रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी येथील एका व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड गुन्हेवृत्त: कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कामगार महिलेवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना म्हाडाचे घर मिळवून देतो असे खोटे सांगितलेले. त्यांना आमिष दाखवून म्हाडाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सह्या करून पत्र नागरिकांना दिले. प्रत्येकाकडून मिळेल ती रक्कम घेऊन अनेक नागरिकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button