ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग २०२६’ चे उत्साहात उद्घाटन

पिंपरी | पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे भोसरी परिसरातील युवकांना आपली क्रीडा कौशल्ये सादर करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्थानिक पातळीवर अशा स्पर्धा सातत्याने आयोजित झाल्यास खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि प्रगतीची प्रेरणा निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर राजमुद्रा क्रिकेट क्लबच्या वतीने स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. महापौरांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करून स्पर्धेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

हेही वाचा      :              महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाच्या दर्शनाला 

या कार्यक्रमास आयोजक कैलास लांडगे यांच्यासह मधुकर महाराज साखरे, गणेशभाऊ भालेकर, स्वप्नीलभाऊ लांडगे, आनंदभाऊ चव्हाण, सचिनभाऊ लांडगे, आनंदभाऊ आरबुज, राहुलभाऊ लांडगे, संजयमामा पवार, शिवाजीभाऊ देवकुळे, संतोषभाऊ लांडगे, सतीशभाऊ लांडगे तसेच विविध संघांचे संघमालक, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, क्रिकेटसारख्या खेळांमधून संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो. ही मूल्ये समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असून अशा उपक्रमांमुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळण्यास मदत होते.

दरम्यान, या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी ९१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच ‘मॅन ऑफ द सिरीज’ विजेत्यास दुचाकी, तर अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूस सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button