ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

भाजपा आमदार महेश लांडगे यांची आढावा बैठक

राज्य शासनाकडे विविध मागण्यांचा पाठवणार प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील मूलभूत समस्यांवर चर्चा करून त्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी उपाययोजना ठरवण्यात आल्या.

बैठकीत नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, बंद पथदिव्यांचे दुरुस्ती कामे, सांडपाणी वाहिन्यांचे नियमन आणि खराब रस्त्यांच्या दुरुस्तीवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व बाबींसाठी नगरपालिकेच्या तांत्रिक टीमकडून सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.

महेश लांडगे यांनी या मुद्द्यांवर राज्य शासनाकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा      :          अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

बैठकीत उपस्थित सर्वांनी शहराच्या विकासासाठी आळंदीकरांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्याचा आणि स्वच्छ, सुबक व विकसित आळंदी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानपीठाची पायाभरणी होणार असून, आळंदीला “विकासाचे रोलमॉडेल” बनवण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

आळंदीकरांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी नियमन आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसह शहराचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. आम्ही राज्य शासनाकडे सर्व आवश्यक मागण्यांचा पाठपुरावा करून आळंदीला ‘विकासाचे रोलमॉडेल’ बनवण्याचा संकल्प केला आहे.

– महेश लांडगे, अमादार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button