Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे-पिंपरी-चिंचवडकरांसाठी फॅशन, फन, फूड-सगळं एकाच ठिकाणी!

बालेवाडीत दोन दिवसीय "समर शॉपिंग अँड फूड फेस्टिवल"चे आयोजन

पुणे | उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि शॉपिंगसोबत खाद्यप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारा “समर शॉपिंग अँड फूड फेस्टिवल” बालेवाडीत १७ आणि १८ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. संध्याकाळी ४ वाजता सुरू होणारा हा फेस्टिवल रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, बालेवाडीत दोन दिवस खरेदी, खवय्यांसाठी विविध पदार्थांची चव आणि कुटुंबांसाठी करमणुकीचा मनसोक्त अनुभव मिळणार आहे.

बालवाडीत १७ आणि १८मे दरम्यान “समर शॉपिंग अँड फूड फेस्टिवल”चे आयोजन करण्यात आले आहे. . या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हा फेस्टिव्हल बालवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर दुपारी ४.०० ते रात्री १० वाजेपाट्यांत पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली दोन दिवस मिळणार आहे.

समर शॉपिंग फेस्टिवलमध्ये काय?

या “समर शॉपिंग फेस्टिवल” मध्ये प्रामुख्याने पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, लॉन्ग आणि शॉर्ट कुर्तीज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, लहान लहान मुलांसाठी लाकडी खेळणी बेडशीट, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, ऑरगॅनिक प्रॉडक्ट, शोभेच्या वस्तू, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, होम डेकोरच्या वस्तू, असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात.

हेही वाचा   :  महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट 

महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन…

अश्या या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत ग्रीन अँपल एक्सहिबिशन हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचेही काम ग्रीन अँपल एक्सहिबिशन करत आहे. हिंजवडी आय. टी. जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडीकारणांसाठी खास संक्राती शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी बाणेर-बालेवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. तसेच या पुढेही ऑनलाईन सेवा देऊ शकता तरी या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा.

लहान मुलांसाठी खास आकर्षण..

या फेस्टिव्हल मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असणारे लांब पायाचे स्टिल्ट वॉकर, आणि जोकर यांची लहान मुलांच्या करमणुकीसाठी तसेच जम्पिंग आणि किड्स बॉऊन्सिंग असणार आहे. त्याच बरोबर थोरामोठांसाठी “ये शाम मस्तानी” हा सदाबहार गाण्यांचा प्रोग्रॅमही असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button