Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.३९ कोटींची फसवणूक

पिंपरी-चिंचवड | ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांची तब्बल २ कोटी ३९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली असून सायबर आणि चिखली पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींनी फिर्यादींच्या वडिलांना “5paisa Private Advisory” आणि “1781-5paisa Customer Service Center” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. शेअर ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. आरोपींनी लिंक पाठवून “5PASPMTA” नावाचे अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेगवेगळ्या शेअर्स आणि आयपीओच्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. अॅपवर खोटा नफा दाखवत फिर्यादींच्या वडिलांकडून २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपये उकळण्यात आले. पैसे गुंतवल्यानंतर मात्र आरोपींनी संपर्क तोडत नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे तपास करत आहेत.

हेही वाचा      :              १३ वर्ष मृत्यूशी झुंज… अखेर इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी 

चिखली पोलीस ठाण्यातील दुसऱ्या घटनेतही अशाच प्रकारे एका महिलेने फिर्यादींना “621 NWMG-Fortune Navigator Club” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. Nuvama High Networth कंपनीचे ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करण्यास सांगून मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगत फिर्यादींकडून ३० लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. पैसे परत न करता आरोपीने विश्वासघात करत फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), ३१६ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक फडतरे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुप, लिंक किंवा अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button