Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सक्षम सोशल फाउंडेशनमुळे आदिवासी पाड्यावर फुलली आनंदाची दिवाळी!

अतिश बारणे यांच्या पुढाकारातून आदिवासी पाड्यावर फराळ वाटप उपक्रम

पिंपरी चिंचवड : दरवर्षीप्रमाणे यंदाही सक्षम सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळीचा आनंद सर्वांसोबत साजरा करण्यात आला. यामुळे आदिवासी पाड्यावर अक्षरशः आनंदाची दिवाळी साजरी झाली.

सक्षम सोशल फाउंडेशन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे यांच्या पुढाकारातून आणि उद्योजक संतोष सीताराम बारणे यांच्या सहकार्याने आदिवासी भागात दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

हेही वाचा –  राज्यातील कृषी सेवा केंद्रांचा मंगळवारी बंद

या उपक्रमांतर्गत भोमाळे गाव, दीप नगर, शिरगाव-विठ्ठलवाडी, टोकावडे आणि भिसे वस्ती या भागांमध्ये दिवाळीचा आनंद पोहोचवण्यात आला. समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आनंदाचे क्षण पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असल्याचे बारणे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

सक्षम सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम फक्त फराळ वाटपापुरता मर्यादित नसून समाजाशी जोडलेला आहे . प्रत्येकासोबत आनंद वाटण्याची खरी परंपरा जपणारा आहे. या उपक्रमाद्वारे फाउंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ केली आहे.

-आतिश बारणे, सक्षम सोशल फाउंडेशन

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button