ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जिजामाता रुग्णालयातील आरोग्य सेवांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला सविस्तर आढावा

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता, औषधसाठा, डॉक्टर व परिचारिका यांची उपलब्धता तसेच उपचार प्रक्रियेची कार्यक्षमता याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला.

हेही वाचा 

राज्यात पाऊस आणि उन्हाचा दुहेरी तडाखा; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जिजामाता रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी. रुग्णालयातील स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तत्परता याकडे विशेष लक्ष संबंधित विभागाने द्यावे. नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आरोग्य सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, असे देखील त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button