Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात…‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’!

  • पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी वैद्यकीय सहायता कक्ष सुरू

 

पिंपरी । प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी शहरातील नागरिकांसाठी वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ असे ब्रिद हाती घेतले आहे.

शहरातील खासगी रुग्णालये गोरगरिब नागरिकांची बिलासाठी पिळवणूक करीत आहेत. खासगी रुग्णालयांकडून कोविड- १९ रुग्णांवर उपचार केल्यानंतर बिलांसाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची अद्यापही आर्थिक पिळवणूक सुरूच आहे.

तसेच, उपचारा दरम्यान रुग्ण दगावले जात असतानाही खासगी रुग्णालये बिलांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी यावर आळा घालण्यासाठी वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी 7507411111 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button