पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा होणार गौरव!
भाजपा युवा मोर्चातर्फे ‘किल्ले बनवा स्पर्धा २०२५’चे आयोजन

अध्यक्ष दिनेश यादव यांच्याकडून युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि गडकिल्ल्यांची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची माहिती, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि रचना, शैली युवा पिढीला समजावी, तसेच शिवकालीन संस्कृतीचा सन्मान व्हावा हा उद्देश आहे.

हेही वाचा : “एक मुट्ठी अनाज” उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजले सामाजिक भान
असे आहेत स्पर्धेचे मुख्य नियम व अटी
ही स्पर्धा केवळ पिंपरी चिंचवड शहरापुरती मर्यादित आहे. स्पर्धकाच्या वयावर कोणतीही बंधनं नाहीत. परीक्षणावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा किल्ल्याजवळ ठेवून पूजन करणे अनिवार्य आहे. स्पर्धकाने स्वतः तयार केलेल्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती सांगणे आवश्यक आहे.
पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा यास प्राधान्य दिले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
अशी करा नोंदणी
स्पर्धेसाठी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. इच्छुकांनी (https://forms.gle/hteJebRkZK577pgo7)या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. या स्पर्धेचे संयोजक अभिजीत बागुल असून, अधिक माहितीसाठी ८६६९४८१०१८ / ७७७५९०४३४० या क्रमांकावर संपर्क साधावा.
या उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमी आणि कलाप्रेमी युवक-युवतींना आपले कौशल्य आणि शिवभक्ती व्यक्त करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा
– दिनेश यादव, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर.




