अन् त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!
शिक्षण विश्व :मास्टर माईंड स्कूलच्या पुढाकारातून ' दिवाळी ड्राइव्ह २०२५ चे' आयोजन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने स्नेहवन आश्रम तसेच दिघी परिसरातील झोपडपट्टी भागात दिवाळी ड्राइव्ह उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना तसेच आश्रमातील विद्यार्थ्यांना चादरी, साड्या, मिठाईचे डबे व खाऊचे वाटप करण्यात आले. एकूण २६५ लाभार्थ्यांना या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. यामध्ये स्नेहवन आश्रमातील मुले व दिघीतील झोपडपट्टीमधील कुटुंबांचा समावेश होता.
हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा होणार गौरव!
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आणि दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणानिमित्त, गरजूंना आधार देण्याचा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा मुख्य उद्देश या उपक्रमामागे होता.या उपक्रमास मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नॅशनल ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शन फोरम, बुधानी वेफर्स व अमर कुटे यांचे सहकार्य संस्थापक साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन अध्यक्ष फिरोज खान, मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्राचार्य डॉ. प्रदीपा नायर, पारुल गुप्ता, लीना बोरहाडे, कमलेश स्वामी, फिरोज खान यांच्यासह शालेय शिक्षकवृंद श्रेया चव्हाण, शीला शर्मा, अर्चना कुलकर्णी, मीनाक्षी नाईक, दीप्ती वालके उपस्थित होते.
या उपक्रमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, दिवाळीच्या आनंदात प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा संदेश दिला गेला.
-प्राचार्य डॉ. प्रदीपा नायर, मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज




