पिंपरी / चिंचवड

​प्रभाग ३१ मध्ये प्रचाराची रणधुमाळी; आरोग्य समस्यांवरून शिवसेना उमेदवार आक्रमक

​पिंपरी चिंचवड :  “जनतेच्या आरोग्याशी खेळाल, तर गाठ शिवसेनेशी आहे! लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासकीय दिरंगाईला आता शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल,” असा कडक इशारा देत प्रभाग क्रमांक ३१ मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी नवी सांगवीतील ड्रेनेजचा गंभीर प्रश्न धसास लावला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

बोरिंगचे पाणी झाले होते दूषित नागरिकांचे आरोग्य धोक्यात

​गेल्या अनेक वर्षांपासून ढोरे फार्म येथील ड्रेनेज लाईन फुटल्याने सांगवीतील नागरिक नरकयातना भोगत होते. हे सांडपाणी परिसरातील मोठ्या सोसायट्यांच्या बोरिंगमध्ये मिसळल्यामुळे पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. यामुळे नागरिकांना त्वचाविकार (Skin Infection) आणि इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागत होता. ही बाब शिवसेना उमेदवारांच्या निदर्शनास येताच, त्यांनी क्षणाचाही विंलब न लावता संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. तातडीने काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्यानंतर ड्रेनेज दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

​समाजकार्याला सत्तेची जोड द्या; विकासाचा शब्द

​प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना उमेदवार म्हणाले की, “गेल्या १५ वर्षांपासून आम्ही निष्ठेने निस्वार्थ समाजकार्य करत आहोत. पण समाजकार्याला सत्तेची जोड मिळाली तर प्रभागाचा विकास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करता येतो. तुमच्या हक्काचा, स्थानिक आणि हाकेला धावून येणारा नगरसेवक हवा असेल, तर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.”

हेही वाचा –  गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

​महिला सक्षमीकरणावर विशेष भर

​निवडणूक जाहीरनाम्यात केवळ रस्ते आणि गटारेच नव्हे, तर महिलांच्या आर्थिक प्रगतीवरही भर देण्यात आला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांची सुरक्षा आणि त्यांचे स्वावलंबन ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.

​बालेकिल्ल्यात पुन्हा ‘भगवा’ फडकणार!

​नवी सांगवी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. “घेतला वसा लोकांच्या हिताचा, समाजसेवा हाच मनी ध्यास; सर्वांच्या साथीने करू प्रभागाचा सर्वांगीण विकास!” या ब्रीदवाक्यासह शिवसेना धनुष्यबाण पॅनेल मैदानात उतरले आहे. जनसंवाद सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाही या बालेकिल्ल्यात भगवाच फडकणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

​शिवसेना (धनुष्यबाण) पॅनेलचे अधिकृत उमेदवार
​(अ) मनिषा आश्विन खुडे (अनुसूचित जाती)
​(ब) प्रशांत बबनराव कडलग (नागरिकांचा मागासवर्ग)
​(क) आरती संभाजी भेगडे (सर्वसाधारण महिला)
​(ड) मेघराजराजे सिध्दार्थ लोखंडे (सर्वसाधारण)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button