Uncategorized

प्रभाग 8 मध्ये भाजप पॅनेलचा प्रभागात दौरा ; महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

भोसरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांनी संयुक्तरित्या प्रचार मोहीम राबवित नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचार दौऱ्यात घेतलेल्या नागरिकाच्या भेटीने उमेदवारांनी थेट रहिवाश्यांशी संवाद साधत समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली.

या प्रचार दौऱ्यात डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे, सौ. नम्रता योगेश लोंढे, सौ. निलम शिवराज लांडगे आणि दोन दशके अनुभवी नगरसेवक विलास हनुमंतराव मडिगेरी हे चारही उमेदवार एकत्रित प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. यासोबत हनुमंत अण्णा लांडगे, विजय अण्णा चौधरी, संदीप झोबाडे, संतोष निसर्गध, कुंदन काळे, गीता महिंद्रू, आशा काळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

हेही वाचा –  प्रभाग ३१ मध्ये प्रचाराची रणधुमाळी; आरोग्य समस्यांवरून शिवसेना उमेदवार आक्रमक

प्रभागातील सेक्टर क्र. 4 मधील विविध सोसायट्यांमध्ये झालेल्या भेटीदरम्यान महिला मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ओवाळून शुभेच्छा देत महिलांनी भाजप पॅनेलला मोठे समर्थन दर्शविले. या दौऱ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनाही नवीन उर्जा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील कार्यकाळात झालेल्या विकासकामांची पावती म्हणून यावेळी भाजपच्या उमेदवारांना नागरिकांनी विश्वास व्यक्त करत पॅनलला विजयी शुभेच्छा देऊ, असे आश्वासन दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत ही प्रचार मोहीम आणखी जोर धरण्याची शक्यता असून प्रभाग 8 मधील राजकीय वातावरण अधिक रंगतदार आणि भाजपमय झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button