भाजपची रणरागिनी शेतकरी बांधवांच्या मदतीला
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपा शहर चिटणीस कविता भोंगाळे यांचा आदर्शवत पुढाकार

पिंपरी चिंचवड : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपा चिटणीस कविता भोंगाळे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत रणरागिनीची भूमिका बजावली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कविता भोंगाळे यांचा पुढाकार आदर्शवत ठरला आहे.
मोशी-मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून १०६ गोधन दान करण्यात आले. या उपक्रमात कविता भोंगाळे यांनी एक गोधन, एक टन चारा आणि वैद्यकीय किट सुपूर्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या विस्कटलेल्या संसाराला आधार देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी गोधन दान उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कविता भोंगाळे यांनी यापूर्वी पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य, धान्याचे किट आणि ऊबदार वस्त्र वाटप केले होते. आता गोधन दान करून त्यांनी शेतकऱ्यांच्या नवजीवनाची वाट अधिक सक्षम केली आहे.या उपक्रमाचे उद्घाटन बोऱ्हाडेवाडीतील स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण शंभूसृष्टी येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“गोधन दानामुळे पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी पुन्हा स्थिर होण्यास मदत होईल. शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या गोधनामुळे हसू फुलले आहे. गोधन हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा कणा असून, त्याद्वारे दूध उत्पादन आणि पशुधन पुनर्बांधणी शक्य होईल.”
– कविता भोंगाळे, चिटणीस, पिंपरी चिंचवड शहर भाजपा





