Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गिफ्ट व्हॉऊचरच्‍या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा; पिंपरी चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पिंपरी  : महिला दिनानिमित्त व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर डी मार्ट कडून विशेष गिफ्ट व्हॉऊचर मिळणार असल्याचा दावा करणारी एक बनावट लिंक सर्वत्र प्रसारित होत आहे. ही लिंक कोणीही ओपन करू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.

सायबर चोरट्यांकडून प्रसारित करण्‍यात आलेली ही लिंक ओपन केली असता, त्यामध्ये प्रश्न-उत्तरांची एक सिरिज दिली जाते. सुरुवातीला अगदी साधे-साधे प्रश्न विचारले जातात. त्‍यानंतर आपली वैयक्तिक व बँक खात्याची माहिती (बँक एटीएम कार्ड नंबर, पासवर्ड, सीव्हीव्ही नंबर, इंटरनेट बँकिंग आयडी पासवर्ड) घेतली जाते. त्यानंतर सायबर गुन्हेगार नमुद बँक खात्याच्या माहितीचा वापर करून लोकांची फसवणुक करीत आहेत.

हेही वाचा –  कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

नागरिकांसाठी महत्वाची सुचना

– डी मार्ट यांच्याकडून विशेष गिफ्ट बाबत व्हॉटसॲपवर आलेली फेक लिंक ओपन करून नये,

– लिंकमध्‍ये विचारलेली आपली वैयक्तिक व बँक खात्याची माहिती देवू नका.

– फसवणुकीसंदर्भात संशय आल्यास सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in वर त्‍वरीत संपर्क साधा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button