Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मी चुकलो, मला एक संधी द्या’; रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाने मागितली माफी

पुणे : येरवड्यातील रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा याने एक माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मी चुकलो, मला एक संधी द्या, असं तो यामध्ये म्हणत आहे. घटनेनंतर गौरव हा फरार झालेला आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी त्याने व्हिडिओ व्हायरल करून माफी मागितली. तसेच, पुढच्या आठ तासात येरवडा येथे हजार होणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याने नक्की कुठून व्हिडिओ व्हायरल केला हे समजू शकले नाही.

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेतील तरुणाकडून धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीच्या शोधार्थ पथके रवाने केली. हा प्रकार म्हणजे कल्याणीनगर भागातील पोर्शे अपघात प्रकरणाची आठवण करुन देणारा आहे. पोर्शे कार प्रकरणा प्रमाणेच येरवडा पोलिसांनी सुरवातीला याही प्रकरणात बेफिकिरी दाखवली आहे.

गौरव मनोज अहुजा असे मुलाचे नाव असून तो एका बड्या व्यवसायीकाचा मुलगा आहे. त्याच्याविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यास सार्वजनीक ठिकाणी अश्‍लिल कृत्य करणे, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव अहुजा याला २०२१ मध्ये बेटींगच्या व्यवहारातून एका मद्य व्यवसायीकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळताना गुन्हे शाखेने अटक केली होती. तो बेटींगमध्येही सक्रीय झाल्याचे उघड झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गौरवच्या शेजारी भाग्येश निबजीया नावाचा त्याचा मित्र बसला होता. त्यालाही ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तर, गौरवाचा पोलीस पथके शोध घेत आहेत.

हेही वाचा – ‘ऊस शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर क्रांतिकारक ठरेल’; हर्षवर्धन पाटील

फुटपाथवर लघुशंका करताना तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे सर्व आपल्या मोबाइलमध्ये शूट केले. त्यामध्ये हा तरुण लघुशंका करताना तसेच काय करणार व्हिडिओ शूट करुन ? असे त्या व्यक्तीशी बोलताना दिसतो आहे. तसेच कारमध्ये बसल्यानंतर त्याने आपली पँट खोलून किळसवाणे कृत्य केले, हे देखील मोबाइलच्या कॅमेरॅत शूट झाले आहे. यानंतर कारचा दरवाजा लावत त्याने अत्यंत वेगाने कार दामटली आणि तो येरवड्याच्या दिशेने निघून गेला. विशेष म्हणजे ज्यावेळी तो फुटपाथवर लघुशंका करीत होता तेव्हा बाजुने काही महिला देखील चालल्या होत्या.

मनोज अहुजा हे एक हॉटेल व्यावासिक आहेत. त्यांच्या मुलाने भर चौकात केलेल्या कृत्याच्या बातम्या झळकल्यानंतर त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, तो माझा मुलगा असल्याचे मला लाज वाटते. माझ्या मुलाने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे, त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलावले आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल, ती मला मान्य आहे. मुलाचा मोबाइल सकाळीपासून बंद आहे. आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत.

आजोबा, मुलगा आणि नातू असे तिघेही लॉटरी आणि जुगाराचा धंदा करतात. दोघेही बाप बेटे जेलवारी करुन आले आहेत. गौरवने केलेले कृत्य शरमेचे आहे. सांस्कृतीक शहरात, अशी घाण येतेच कोठून? त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. क्रिकेटच्या बेटींगच्या गुन्हयात दोन्ही बाप लेक होते. गृहराज्यमंत्री नक्की करतात काय? असा सवाल कॉंग्रेसच्या संगीता तिवारी यांनी केला आहे. त्यांच्या गुलाबो गँगच्या वतीने अहुजा यांच्या हॉटेलसमोर निदर्शने करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“गाडीच्या नंबरवरुन चालकाचा शोध घेतला जात आहे. त्याने मद्यपान केले होते का? यासाठी त्याला ताब्यात घेतल्यावर वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. महिलांकडून अद्यापही तक्रार आली नाही, आली तर विनयभंगाचा गुन्हा दाखल करु.”

हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button