नेमबाज राष्ट्रीय खेळाडूकडून भाजपा क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्षपदाचा ‘‘लक्ष्यभेद’’
अरुण पाडुळे यांना पिंपरी-चिंचवड भाजपा क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्षपदी संधी

आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत समर्थकांची संघटनात्मक कामगिरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज खेळाडू अरुण सुभाष पाडुळे यांची भारतीय जनता पक्षाने (भाजप) पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा प्रकोष्ठाचे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही महत्त्वाची नियुक्ती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
अरुण पाडुळे हे स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. विशेष म्हणजे, भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनुभवामुळे शहरातील क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा पक्षातील आणि क्रीडा क्षेत्रातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : PCMC | गव्हाणे वस्ती येथील गणेश मंदिर जिर्णोद्धाराला प्रारंभ
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर अरुण पाडुळे यांनी आमदार महेश लांडगे यांची मुंबईत भेट घेतली. पुढील वाटचालीसाठी आणि शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ठोस योजना आखण्यासाठी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर अरुण पाडुळे यांनी सांगितले की, “आमदार महेश लांडगे यांची भेट आणि मार्गदर्शन खूप प्रेरणादायी ठरली. शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आम्ही ठोस योजना आखत आहोत. योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या कामात आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
भाजपाचे आमदार महेशदादा लांडगे यांनीही अरुण पाडुळे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले, “अरुण सर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय आणि ऑलिंपिक स्तरावर नेत राहतील. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील क्रीडा क्षेत्र निश्चितच प्रगती करेल. आमच्या संघटनात्मक कामगिरीतून देखील खेळाडूंना संधी मिळतील आणि क्रीडा विकासाला चालना मिळेल.” अरुण पाडुळे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये क्रीडा क्षेत्राचा समग्र विकास साधता येईल, आणि स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाजपाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक खेळाडूला योग्य संधी आणि प्रशिक्षक मिळावा, आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आमदार महेश लांडगे यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ यामुळे आमचे काम अधिक ठोस आणि परिणामकारक होईल.
– अरुण पाडुळे, शहराध्यक्ष, क्रीडा प्रकोष्ट, भाजपा.





