शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. ही कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
कोणते शेतकरी पात्र?
- २ लाख रूपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी
- ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरी
- ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले कर्ज
- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन





