हिंजवडीत टेम्पो ट्रव्हलरमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू
दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती.
हेही वाचा : गोरगरिब रुग्णांच्या अर्थसहाय्यासाठी आमदार लांडगे सरसावले!
या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हलमध्ये असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चार जण आतमध्ये कसं अडकले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज एक रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल (MH14 CW 3548) बसला अचानक आग लागली होती. यावेळी बसमध्ये बारा प्रवासी होते. आग लागताच त्यातील 8 जणांनी बसच्या बाहेर सुखरुप आले. मात्र चार जण बसमध्ये होरपळले. या चौघांचाही यात मृत्यू झाला आहे. हे कर्मचारी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे असून ते ऑफिसला जात असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यादरम्यान बसला अचानक आग लागल्याने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. टॅम्पो ट्रॅव्हलची बस असल्याने सर्वांना एकाच वेळी बाहेर निघणं शक्य झालं नाही. त्यामुळे ८ जणं बाहेर पडू शकले मात्र चार जणं बसमध्येच अडकले. या जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही. तरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.