चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने अनुराधा साळुंके यांचा प्रचाराचा शुभारंभ !
नागरिकांच्या आशीर्वादाने, जिवलग सहकाऱ्यांच्या साथीने निवडणूक जिंकण्याचा विश्वास

पिंपरी चिंचवड : चऱ्होलीचे ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत अनुराधा दीपक साळुंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी वाघेश्वर महाराजांच्या चरणी नारळ वाढविण्यात आला. नागरिकांच्या आशीर्वादाने आगामी महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा ठाम विश्वास अनुराधा साळुंके यांनी व्यक्त केला.
अनुराधा साळुंके आणि त्यांचे पती दिपक साळुंके यांनी श्री वाघेश्वर महाराज मंदिरात अभिषेक करून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. चऱ्होलीच्या परंपरेनुसार ग्रामदैवताच्या आशीर्वादाने कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याची प्रथा असल्याने या पवित्र स्थानातूनच प्रचाराला प्रारंभ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याप्रमाणे वाघेश्वर महाराजांच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराची सुरवात त्यांनी केली. यावेळी अनुराधा साळुंके म्हणाल्या, चऱ्होली परिसरातील दिवसाआड मिळणारे पाणी, खराब रस्ते आणि खड्डे या लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. येथील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी नियोजनबद्ध विकासकामांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले . तसेच खड्डेमय रस्त्यांमुळे पावसाळ्यात वाढणाऱ्या दुर्घटना आणि त्रासाला पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – वाहनधारकांना मोठा दिलासा..! एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यास पुन्हा मुदतवाढ

ग्रामस्थांचा पाठिंबा
या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमाला परिसरातील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व समावेशक विचारांचा प्रतिनिधी आपल्याला महापालिका सभागृहात न्यायचा आहे. आपले प्रश्न जो प्रतिनिधी मांडेन त्या प्रश्नांवर उत्तर शोधून सुधारणा करेल असा प्रतिनिधी अनुराधा साळुंखे यांच्या रूपात आम्ही पाहत आहोत अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
गावकऱ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यावर ही निवडणूक लढवित आहे. गावकर्यांचा आपुलकीचा हात हेच आपले खरे सामर्थ्य आहे. संघर्षाच्या काळात नागरिकांनी दिलेला आधार अमूल्य असून पुढील प्रवासातही तशीच साथ मिळेल असा विश्वास आहे. ग्रामदैवताच्या आशीर्वादाने निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा होत असल्याने सकारात्मक भावना आहे. नव्या राजकीय प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला गावकऱ्यांची उत्स्फूर्त साथ आहे.
-अनुराधा साळुंके




